उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटला पुन्हा ‘ब्ल्यू टिक’, ट्विटरने केली चुकीची दुरस्ती

Venkaiah Naidu Twitter account gets blue tick again

दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्ल्यू टिक’वरून (blue tick) शनिवारी बराच गोंधळ उडाला. मायक्रोब्लॉगिंक वेबसाईट असलेल्या ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील ब्ल्यू टिक (अकाऊंट विश्वसनीय असल्याचे दर्शवणारे निळ्या रंगाचे चिन्ह) काढून टाकले होते. याबद्दल नेटीजन्सने नाराजी व्यक्त केल्यानंतर ब्ल्यू टिक पुन्हा टाकण्यात आले.

खात्रीशीर, विश्वसनीय आणि सक्रिय असलेल्या ट्विटर खात्याबद्दल इतर वापरकर्त्यांना आश्वस्त करण्यासाठी ट्विटरकडून ब्ल्यू टिक अर्थात ‘ब्लू व्हेरीफाईड बॅच’ दिला जातो. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यालाही ब्ल्यू टिक देण्यात आला आहे. हा ब्ल्यू टिक ट्विटरकडून हटवण्यात आल्याचे शनिवारी निदर्शनास आले. नंतर यावरून बरीच चर्चा रंगली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवल्या बद्दल सरकारने आणि भाजपाने नाराजी व्यक्त केली होती. यावरून ट्विटरवर टीका सुरू झाली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ट्विटरने पुन्हा नायडूंच्या अकाउंटला ब्ल्यू टिक दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button