
मुंबई : महाविकास सरकार (MVA Govt) गद्दारीनं आल असून ते निकम्म असल्याची टीका भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊतांनी (Vinayak Raut) त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
नारायण राणेंनी मिटक्या मारत बसाव. त्यांना सत्ता काही मिळणार नाही. गद्दारीवर राणेंनी काही बोलू नये. बेईमान आणि गद्दारी म्हणजे राणे, अशा शब्दात विनायक राऊतांनी राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे एका जबरदस्त केसमध्ये अडकले आहेत. एका केसमध्ये ते तुरूंगाच्या दारापर्यंत जाऊन आलेत. तो तुरूंगवास टाळावा म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
तसेच नारायण राणेंनी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काय केलं हे सर्वांना माहित आहे. राणेंच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, असंही राऊत म्हणाले.
ही बातमी पण वाचा : शरद पवार यांचे नेतृत्व मी स्वीकारले : एकनाथ खडसे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला