राष्ट्रवादीचे दिग्गज आमदार मकरंद पाटील कोरोना बाधित

NCP - Makrand Patil - Corona Positive

सातारा : सध्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच आता सातारा जिल्ह्यातील वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे. यापूर्वी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होत. मकरंद पाटील हे माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आहेत.

साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढल्याने मार्च महिन्यापासून आमदार पाटील प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी सतत संपर्क दौऱ्यावर होते. मार्च महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. त्यातच सातारा जिल्ह्यात पहीला कोरोना बाधित रुग्ण खंडाळा येथे आढळून आला होता. त्यानंतर मतदार संघात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून आ.पाटील प्रशासनाला सोबत घेऊन लोकांना सतर्क करत होते.

आमदार मकरंद पाटील कोरोना बाधीत झाल्याचे समजताच मतदार संघासह जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते, समर्थक व मित्र मंडळींना धक्का बसला आहे. अलीकडच्या काही दिवसांत जर कोणी माझ्या संपर्कात आले असेल तर त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER