ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

veteran-actress-ashalatha-dies-in-satara

मुंबई : मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर (Ashalta Waggaonkar) यांचे आज पहाटे कोरोनामुळे (Corona) निधन झाले .

‘आई माझी काळूबाई’ (Aai Mazi Kalubai ) या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये आशालता या देखील मुख्य भूमिकेत होत्या. . कोरोनाची लागण झाल्यामुळे आशालता यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होतं. पण अखेर आज पहाटे ४ वाजता अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोर्चा मालिकांकडे वळविला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER