ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ काळाच्या पडद्याआड; सोशल मीडिया गहिवरला

रामचंद्र धुमाळ

मुंबई  : मराठी सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं पुण्यात निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. मागच्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. उपचारादरम्यान पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेमांसोबतच त्यांनी वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या होत्या.

‘सेक्रेड गेम्स’ फॅण्ड्री, म्होरक्या, ख्वाडा, बोनसाय या सिनेमांत त्यांनी अभिनय केला होता. याशिवाय भाडिपाच्या डिजिटल कार्यक्रमातही त्यांचा अभिनय पाहायला मिळाला होता.

त्यांच्या निधनाने सोशल मीडिया गहिवरला आहे. फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटरवर सर्व माध्यमांमध्ये धुमाळ काकांना आदरांजली वाहन्यात येत आहे. प्रत्येजकजण त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. धुमाळ काकांनी अनेक नवोदित कलाकारांना घडवले आहे. त्या सर्व कलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER