ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ (Raghavendra Kadkol) यांचे दीर्घ आजाराने ८३  व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कडकोळ यांनी ‘झपाटलेला’ या चित्रपटात बाबा चमत्कार ही भूमिका साकारली होती. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकेत काम केले आहे.

त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. राघवेंद्र यांनी कृष्णधवल या चित्रपटापासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी रंगभूमीवर काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर अशा दिग्गज कलावंतांसोबत काम केले. ‘झपाटलेला’ या चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका विशेष गाजली होती.

या चित्रपटात त्यांच्यासह लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकात धर्माप्पा ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER