ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि विश्वजीत यांचा ‘इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्कारा’ने होणार सम्मान

Veteran actor, director and Vishwajeet will be honored with the 'Indian Personality of the Year Award'

बॉलिवुडमध्ये मराठी कलाकारांबरोबरच साऊथ आणि कोलकाता येथील कलाकारांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. असेही अनेक कलाकार आहेत जे दुसऱ्या राज्यातून मुंबईत आले आणि अल्पावधीतच त्यांना बॉलिवुडने स्वीकारले. या कलाकारांनी नंतर अनेक हिट सिनेमे देत बॉलिवुडने त्यांच्यावर टाकलेला विश्वास किती सार्थ आहे हे दाखवून दिले. या अशा अनेक कलाकारांपैकीच एक कलाकार म्हणजे विश्वजीत उर्फ बिस्वजीत चटर्जी. त्यांना ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणूनही ओळखले जात असे. ते केवळ अभिनेताच नाहीत तर ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि गायकही आहेत. कोलकाता आणि बॉलिवुड इंडस्ट्रीत यशाचा ठसा उमटवणाऱ्या या कलाकाराला गोवा येथील 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ इयर’  (Indian Personality of the Year Award)पुरस्काराने गौरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती, माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. मार्च 2021 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बिस्वजीत यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

बिस्वजीत यांनी कोलकात्यात अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. माया मृग आणि दुई भाई हे त्यांचे सुरुवातीचे सिनेमे प्रचंड गाजले होते. त्यानंतर हिंदी सिनेमात काम करण्यासाठी ते मुंबईला आले. 1962 मध्ये त्यांना ‘बीस साल बाद’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. सिनेमातील कुमार विजय सिंग ही त्यांनी सांकारलेली भूमिाक प्रेक्षकांना प्रचंड आवडली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. त्यानंतर बिस्वजीत यांनी ‘कोहरा’ मध्ये राजा अमित कुमार सिंग, ‘एप्रिल फुल’ मध्ये अशोक, ‘मेरे सनम’ मध्ये रमेशकुमार, ‘नाईट इन लंडन’ मध्ये जीवन, ‘दो कलियाॅं’ मध्ये शेखर आणि ‘किस्मत’ मध्ये साकारलेल्या विकीच्या भूमिकांना प्रेक्षकांनी खूपच डोक्यावर घेतले होते.

हिंदीत त्यांनी आशा पारेख, वहिदा रेहमान, मुमताज, माला सिन्हा, राजश्री या त्यावेळच्या हिट नायिकांसोबत काम केले होते. तसेच 1975 मध्ये ‘कहते हैं मुझको राजा’ नावाच्या सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते. या सिनेमात धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी आणि रेखा यांच्या मुख्य भूमिका होत्या. हिंदीत काम करीत असतानाच त्यांनी बंगाली सिनेमातही काम करणे सुरु ठेवले होते. 1968 मध्ये ‘चौरंघी’, उत्तम कुमार यांच्यासमवेत ‘गढ नसीमपूर’, ‘कुहेली’ आणि त्यानंतर ‘श्रीमान पृथ्वीराज’, ‘जय बाबा तारकनाथ’ आणि ‘अमर गीती’ या बंगाली सिनेमात काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER