
आयुर्वेद म्हटले की काढा, पथ्य, कडू औषध अशीच कल्पना आपण करतो. परंतु आयुर्वेद हे केवळ चिकित्साशास्त्र नसून आहार विहार दिनचर्या इथपासून वर्णन आहे. आहार तर शरीराचा उपस्तंभ आहे ते चांगल्या प्रकारे घेणे तर आवश्यकच आहे. अनेक पथ्य आहार आयुर्वेदात सांगितला आहे. पथ्य आहाराच्या पाककृती सुद्धा आयुर्वेदात आहेत. ताप असो वा दमा, मूळव्याध सर्वच व्याधींमधे आहार काय घ्यावा एवढे सूक्ष्म विचार करणारे आयुर्वेद शास्त्र आहे. वेसवार हा पदार्थांची चव वाढविणारा एक मसाला तसेच जाठराग्नि वाढविणारा मसाला म्हणून वापरण्यात येतो.
बघूया याचे घटक हिंग, अर्द्रक, जीर, मिरे, हळद, धणे हे क्रमशः वाढत्या प्रमाणात एकत्र करावे. या सर्व द्रव्यांना एकत्र वाटून प्रमाणात भाज्यांना घालावा. हा मसाला तेल वा तुपात छान परतावा. उग्र गंध येण्यास सुरवात झाली की वेसवार मसाला उत्तम झाला असे समजावे.
गोड पदार्थांकरीता मसाला – वेलची, लवंग, कर्पूर, कस्तूरी, मिरे, दालचिनी ही सर्व सुगंधी द्रव्ये एकत्र करावी. दुधाचे पदार्थ, गुळाचे पदार्थ गोड पदार्थ यावर हा मसाला भुरभुरावा. श्रीखंडात सुद्धा हा मसाला पाचक ठरतो. तसेच बिर्याणी, शाही भाज्या, मांसाहार या पाककृती केल्या असल्यास पूर्ण तयार झाल्यावर हा मसाला शेवटी वरून घालावा. विविध पाककृतीमधे नक्कीच वापरून बघा!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला