वर्सोवा : सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग; चार जण जखमी

Versova Cylinder Blast

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वर्सोवा (Versova) भागामध्ये एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला (Gas Cylinder Warehouse) भीषण आग लागली आहे. आग लागल्यामुळे एकापाठोपाठ सिलेंडरचा स्फोट होत आहे. प्राथमिक माहितीनुसार आग ही लेव्हल-२ ची असून यामध्ये आतापर्यंत चार जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. अजून तरी आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

वर्सोवा परिसरातील यारी रोडवर आग लागल्याची घटना घडल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली आहे. आग लागलेल्या गोदामाच्या बाजूलाच शाळा आणि हॉस्पिटल आहे. खबरदारी म्हणून परिसर रिकामा करण्यात आला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच येथे अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत आतापर्यंत चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीचे स्वरूप मोठे असल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनही १६ अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER