व्हिनस विल्यम्सने सलग 28 व्या वर्षी जिंकला सामना

Venus Williams

टेनिसच्या (Tennis) दुनियेत सेरेना किंवा व्हिनस (Venus Williams) या दोन्ही बहिणींचे नाव चमकले नाही असे गेल्या साधारण 30 वर्षातील एकही वर्ष राहिलेले नाही. दरवर्षी त्यांनी यश मिळवले आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. व्हिनसने 2021 ची विजयी सुरुवात केली आहे. मेलबोर्न येथील यारा व्हॕली क्लासिक स्पर्धेत तिने सलामीची लढत जिंकली आहे. 40 वर्षे वयात खेळताना अरांता रुस हिला तिने 6-1, 6-3 अशी मात दिली आणि सलग 28 व्या वर्षी व्यावसायिक टेनिसच्या डब्ल्यूटीए टूर स्पर्धांमध्ये दरवर्षी किमान एकतरी सामना जिंकण्याचा विक्रम केला.

1994 पासून दरवर्षी व्हिनसने व्यावसायिक स्पर्धात्मक टेनिसचा किमान एकतरी सामना जिंकलेला आहे. सलग एवढी वर्षे सातत्य राखणारी ती एकमेव खेळाडू आहे.

या यशानंतर व्हिनसने सद्यस्थितीला अगदी संयुक्तिक प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, वयाची 40 गाठली असली तरी माझ्या हाती अजून रॕकेट आहे आणि माझी रॕकेट चांगले काम करतेय. अजुनही आनंद येतोय…विशेषतः विजयानंतर! स्टे पाॕझिटिव्ह अँड टेस्ट निगेटिव्ह!!

व्हिनसचा गेल्या वर्षीच्या फ्रेंच ओपननंतरचा हा पहिलाच सामना होता.व्हिनस ही माजी नंबर वन असून सात ग्रँड स्लॕम विजेतेपदं तिच्या नावावर आहेत. तिचा पुढचा सामना आता झेक गणराज्याच्या पेत्रा क्वितोव्हाशी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER