पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर्स ५० टक्केच कार्यक्षम; खासदार श्रीकांत शिंदेंचा आरोप

Shrikant Shinde - Ventilator - PM Narendra Modi

ठाणे : पीएम केअर फंडातून कोरोना रूग्णांच्या (Corona) उपचारासाठी उपलब्ध व्हेंटिलेटर केवळ ५० टक्के क्षमतेवर काम करत आहे, असा आरोप शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून चौकशी केली जावी, अशी मागणीही श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मुद्दावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.

पीएम केअर फंडमधून वितरित केलेले व्हेंटिलेटर ५० टक्के क्षमतेवर चालतात. हा निष्कर्ष डॉक्टरांच्या चर्चेतून पुढे आला आहे. ही बाब खरी असेल तर रुग्णांना धोका आहे. हे व्हेंटिलेटर १०० टक्के क्षमेतने चालणारे हवेत. ही बाब पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात आणि देशात अशा प्रकारच्या व्हेटींलेटरचा पुरवठा केला गेला आहे, याची शहानिशा केली जावी, असे शिंदे यांनी मागणी केली आहे. यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. नेमके किती व्हेंटिलेटर्स पीएम निधीतून पुरविले गेले आहेत, याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकते, असे शिंदे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button