भारतातील कंपन्या बनवणार नासासाठी व्हेंटिलेटर्स

Nasa

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नासा ( दी नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ) ने करोना उपचारांसाठी तयार केलेले व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करण्यासाठी भारतातील – पुण्याची भारत फोर्ज लि., बेंगळुरूची अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. व हैदराबादची मेधा सव्हरे ड्राइव्हज प्रा.लि या ३ कंपन्यांची निवड केली आहे. इतर अठरा कंपन्यांना हे परवाने देण्यात आले असून त्यात आठ अमेरिकी व तीन ब्राझिलियन कंपन्यांचा समावेश आहे.

नासा ही अवकाश संशोधन करणारी संस्था आहे. तिने कोरोनाच्या रुग्णांसाठी दक्षिण कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत नासाने एक व्हेंटिलेटर तयार केला होता. तेथील अभियंत्यांनी तयार केलेल्या या व्हेंटिलेटरला ‘व्हायटल’ असे म्हटले आहे. एक महिन्यात तो तयार करण्यात आला व त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने ३० एप्रिल रोजी परवानगी दिली होती.

‘व्हायटल’ म्हणजे ‘व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी अ‍ॅक्सेसिबल लोकली’नावाचे उपकरण असून त्याचे सुटे भाग पुरवठा साखळ्यात उपलब्ध आहेत. गंभीर रुग्णांवर उपचारासाठी हा व्हेंटिलेटर वापरला जातो. त्याची रचना लवचिक असून त्यात सुधारणाही करता येतात. जेपीएल कार्यालयातील लिऑन अल्कालाय यांनी सांगितले, की हे तंत्रज्ञान जगभरात उपलब्ध व्हावे अशी आमची इच्छा आहे. २३ एप्रिल रोजी त्याची चाचणी घेण्यात आली होती.

या व्हेंटिलेटरबाबत युसीएलएच्या वैद्यकीय प्रमुख डॉ. तिशा वँग म्हणाल्या की – व्हायटल व्हेंटिलेटर हा सादृश्यीकरण चाचण्यात यशस्वी ठरला असून तो गंभीर आजारी करोना रुग्णांना वरदान ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER