PM Cares मधून दिलेले व्हेंटिलेर निकृष्ट; घोटाळा : काँग्रेसच्या नेत्याचा आरोप

Maharashtra Today

मुंबई : पीएम केअर्स निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेले सर्व व्हेंटिलेटर निकृष्ट(Ventilator Scam) आहेत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद द्वारे नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने तसा अहवाल दिला आहे. पीएम केअर्स फंडातील निधीचा हा मोठा घोटाळा आहे, असा आरोप असा आरोप महाराष्ट्र कांग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant)यांनी केला.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महत्त्वाचे असलेल्या व्हेंटिलेटर्सचा तुटवडा आहे. याची ओरड सुरू झाल्यानंतर माहिती उघड झाली की, पीएम केअर्स निधीतून राज्यांना गेल्या वर्षीच व्हेंटिलेर्ट्स देण्यात आले आहेत पण त्यांचा वापरच करण्यात येत नाही! त्यानंतर काही राज्यांनी हे व्हेंटिलेटर्स निकृष्ट असल्याचा आरोप करणे सुरू केले आहे.

सचिन सावंत यांनी कमिटीच्या अहवालाबाबत ट्विट केले आहे – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी एक समिती नेमली होती. वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला पीएम केअर्स (PMCaresFund) अंतर्गत पुरवलेले सर्व व्हेंटिलेटर पूर्णतः निरुपयोगी आढळले. त्यांच्या अहवालानुसार कंपनीचे तंत्रज्ञदेखील हे व्हेंटिलेटर दुरुस्त करू शकले नाहीत. हा मोठा घोटाळा आहे.

केंद्रामार्फत महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटरची राज्यस्तरीय चौकशी करा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button