वेळास कासव महोत्सवाला निसर्ग प्रेमींची पसंती

    velas turtle festival

    रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास समुद्र किनाऱ्यावर निसर्ग प्रेमी सध्या कासवांच्या जत्रेचा आनंद लुटत आहेत. हे कासाव दुर्मिळ असे ऑलिव्ह रिडल प्रजातीचे कासव असून यांना पाहण्यासाठी दूर दुरून निसर्ग प्रेमी कोकणातल्या या सुंदर अश्या वेळास समुद्र किनाऱ्यावर भेट देत आहेत. अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या ऑलिव्ह रिडल सागरी कासवांच्या विणीचा हंगाम कोकण किनारपट्टीवर सुरु झाला आहे.

    ‘कासवांचे गाव’ म्हणून ओेळख मिळालेल्या मंडणगड तालुक्यातील वेळास गावाच्या किनारपट्टीकडे पुन्हा कासवं अंडी घालण्यासाठी येऊ लागली आहेत. जवळपास १५ कासवांच्या अंड्यांची घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. यात जवऴपास १७६७ अंडी आहेत. लवकरच या अंड्यातील पिल्ले समुद्रात झेपावणार आहेत. या कासवांच्या सुरक्षिततेसाठी सह्यांद्री निसर्गमित्र संघटना पुढे सरसावली आहे. दरवर्षी साधारण एप्रिल ते मे महिनिण्याच्या काळात ऑलिव्ह रिडल प्रजातीचे हे कासव अंडी या किनारपट्टीवर येत असतात. त्यामुळे या किनारपट्टीवर वेळास कासव महोत्सव आयोजित केला जात असतो. निसर्गप्रेमी या आगळ्या वेगळ्या कासव महोत्सवाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.