वेखंड – उग्रगंधी बहु उपयोगी कंद

वेखंड

वेखंड (Vekhand) बऱ्याच घरात, आजीबाईचा बटवा, घरगुती उपचार या अंतर्गंत ओळखीचे आहे. वेखंड म्हणजेच वचा बालगुटी, धुरी, लेप या विविध रुपात वापरण्यात येते. वेखंडाचे नेहमी हिरवेगार असणारे क्षुप असते. जमिनीत आल्याच्या कंदाप्रमाणे वाढणारे कंद असतात.

वेखंड वेदना कमी करणारे सूज कमी असणारे असल्याने संधिवात, शिरःशूल, आमवात विकारात वेखंड उगाळून लेप लावतात.

उग्रगंधी उष्ण असल्याने घश्यात छातीत साठलेला कफ कमी करण्यास मदत होते. म्हणूनच सर्दी छातीत कफ दाटल्यास वेखंड उगाळून त्याचा लेप लावतात. विशेषतः लहान मुलांच्या खोकला दमा सर्दीमधे वेखंडाचा अतिशय उपयोग होतो.

थंडी वाजून ताप येत असेल तर वेखंडाचा काढा, कपाळावर वेखंडाचा लेप लावल्या जातो. जेणेकरून ताप वाढून शिरःभागी जात नाही.

 • कफ खूप साठला असेल वेखंड सैंधव कोमट पाणी दिल्याने उलटी व्दारे कफ बाहेर पडतो.
 • अपस्मार मानसरोग आचके येणे यावर वेखंडाचा नस्याप्रमाणे वापर करतात.
 • वेखंड बुद्धीची ग्रहण शक्ती व स्मरणशक्ती सुधारणारे आहे. लहान मुलांमधे बुद्धीवर्धक कार्य वेखंड करते.
 • स्वर्णप्राशन जे मुलांच्या रोगप्रतिकारशक्ती बल बुद्धी स्मृति वाढविण्याकरीता दिले जाते त्यातही वचा वापरली जाते.
 • जी मुलं लवकर बोलत नाही किंवा तोतडे बोलतात अशा लहान मुलांमधे वाक्शक्ति वाढण्याकरीता वेखंडाचा उपयोग होतो. वचा या नावाचा अर्थच वचनशक्ति वाढविणारे द्रव्य असा आहे.
 • पोटात विषारी पदार्थ गेला असेल तर वेखंड मीठ गरम पाण्यासह दिल्याने उलटी होते व विषारी पदार्थ बाहेर पडतो.
 • घरात धूपन करतांना वेखंड घातल्यास वातावरण शुद्ध होते.
 • प्रसवानंतर बाळंतिणीला, बाळाच्या खोलीत ओवा हळद वेखंड युक्त धूपन करतात.
 • वेखंड वामक म्हणजे उलटी करविणारे औषध आहे. त्यामुळे वमन पंचकर्मात वेखंडाचा उपयोग करतात.
 • वेखंड उत्तम मेध्य बुद्धी वर्धन करणारे असल्याने सारस्वतारिष्ट मेध्य रसायन ब्राम्हीप्राश सारख्या मस्तिष्कावर व मानस रोगांवर काम करणाऱ्या औषधी कल्पांमधे इतर औषधींसह वेखंडचा उपयोग होतो.
 • वेखंड उष्ण गरम प्रकृतिचे असल्याने पित्त प्रकृति उष्णतेचे विकार असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER