शाकाहारी अंडी देणारी वनस्पती! आता शाकाहारींनाही खाता येईल ऑमलेट आणि एग रोल !

Vegetarian egg-laying plant! Vegetarians can now eat omelettes and egg rolls!

मुंबईच्या इवो फुड्सनं कोलेस्ट्रोल फ्री एंटी-बायोटीक वेगन अंड (Free anti-biotic vegan eggs) बनवलंय, जे चव, गुणवत्ता आणि प्रोटीनच्या गुणवत्तेच्या तुलनेत खऱ्या अंड्यासारखच आहे. याचा वापर ऑमलेट आणि सँडवीचमध्येही करता येतो.

एका गेमिंग एजन्सीसाठी काम करणाऱ्या अनंत शर्मा (Anant Sharma) यांनी जेव्हा पहिल्यांदा या अंड्यापासून बनलेलं ऑमलेट आणि ब्रेड टोस्ट खाललं होतं तेव्हा त्यांना संशय होता की त्यांना खरोखरच खंड खाऊ घातलंय. पण याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर ते आवाक झाले होते.

इवो फुड्स या कंपनीने अंड्याला पर्याय निर्माण केलाय. २०१९ला कार्तिक दिक्षित आणि श्रद्धा भंसाली यांनी हा स्टार्टअप सुरु केला होता. जवळपास एका वर्षात त्यांनी हा प्रोटोटाइप डाएट तयार केला होता. याची चव, रासायनिक पोषणद्रव्य खऱ्याखुऱ्या अंड्या इतकेच आहेत.

सुरुवात

आज वनस्पती अधारित अनेक आहार बाजारात उपलब्ध आहेत. जलवायु परिवर्तन ही मुख्यप्रेरणा

वनस्पती अंड बनवण्याच्या मागे असल्याच कार्तिक दिक्षित म्हणतात. ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनात शेतीपुरक पशुपालन व्यवसायाचा वाटा १८ टक्क्याचा आहे. हा गॅस ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार आहे. ही जाणीव असल्यामुळं याला पर्याय उपलब्ध करण्यासाठी कार्तिकनं शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला.

२१०४ ला पुण्यातून स्टार्टअप लीडरशीप प्रोग्रॅम पुर्ण केल्यानंतर त्यांनी पशु अधारित खाद्यपदार्थांना वनस्पती माध्यमातून उत्पादित करण्याच निर्णय घेतला. या विकल्पांमुळ पोषण आणि चवीवर परिणाम होणार नाही याची प्राथमिक रित्या त्यान काळजी घेतली.

आधी त्यांनी पेशी अधारित मांस उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं. लगेचच त्यांच्या लक्षात आलंभारता प्रयोगशाळेत मांस बनवण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल इतकीशी माहिती नाहीये. यामुळं अंडी बनवण्याच्या प्रक्रियेवर त्याने विचार करायला सुरुवात केली. भारतात मोठ्या प्रमाणात अंडी खाल्ली जातात. भारतातील सर्वात मांसाहारी खाद्यापदार्थांपैकी अंडं हे खाद्यपदार्थ आहे.

या कच्चा मालाचा झाला उपयोग

अंड्याला विकल्प बनवण्यासाठी वापरण्यात आलेला सर्व कच्चा माल स्वदेशी आहे. भारतीय फळातून सर्व प्रोटीन काढण्यात येतं. त्याचा उपयोग शाकाहारी अंडी बनवण्यासाठी केला जातो. याची प्रक्रिया पुर्णपणे तयार झाल्यानंतर कार्तिक आणि श्रद्धाने स्वतःच्या नावावर हे पेटंट करुन घेतलंय.

बनवण्याची प्रक्रिया

अंड्याला विक्लप बनवण्यासाठी पीडीसीएएएस (प्रोटीन डाइडेस्टिब्लिटी कर्रेक्टेड एमिनो एसिड स्कोर) या प्रक्रियेचा वापर करण्यात आला. उच्चतम प्रोटीनयुक्त बनवण्यासाठी याला ० ते १ अशी श्रेणी देण्यात येते. सोयामध्ये प्रोटीनचे प्रमाण ०.९ असते. अंडे आणि मांसामध्ये पीडीसीएएएसची श्रेणी १ असते. अंड्याच्या तुलनेत यात कमी कॅलरी आणि जास्त प्रोटीन असतात.

हळू हळू व्यवससायात होतीये प्रगती

सध्या सहा लोकांची टीम इवोमध्ये काम करते. ज्यात कार्तिक आणि श्रद्धा हे दोन संस्थापक आणि चार खाद्या वैज्ञानिक आहेत. त्यांच्या या स्टार्टअपला ‘बिग आयडिया वेंचर’ आणि ‘रयान बेथेनकोर्ट’ अशा प्रतिष्ठीत संस्थांकडून फंडींग करण्यात आलंय.

इवोने आत्तापर्यंत २५ हून अधिक रेस्टॉरंट आणि ब्रांड्ससोबत करार केलेत. यामुळं इवोच्या वीगनला मेन्यूत स्थान दिलं जातय. त्यांच ध्येय थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्याच आहे. जर त्यांची ही योजना यशस्वी होते तर त्यांच उत्पादन ३०० मिली लीटर आणि ६०० मिली लीटरच्या बाटल्यांमध्ये सहज उपलब्ध होऊ शकेल.

ही बातमी पण वाचा : ५० पैसे ते १६०० कोटी रुपयांची गरूडझेप घेणाऱ्या महिल्या उद्योगाची ‘लिज्जत’…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER