गाईच्या शेणापासून निर्मित ‘वैदिक पेंट’ लवकरच येणार बाजारात – नितीन गडकरी

Nitin Gadkari

नवी दिल्ली :- गाईच्या शेणापासून निर्मित ‘वैदिक पेंट’ (Vedic Paint) लवकरच बाजारात येणार आहे. याचे उत्पादन खादी आणि ग्रामोद्योग आयोग करणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.

गडकरी यांनी ट्विटर अकाउंटवरून याबाबत एक ट्विट केले. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून वैदिक पेंटची निर्मिती केली जाणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. नितीन गडकरी म्हणालेत, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून लवकरच वैदिक पेंट बाजारात उपलब्ध केले जाणार आहे. वैदिक पेंट, डिस्टेंपर आणि इमल्शन या दोन प्रकारात उपलब्ध होणार आहे. हे पेंट पर्यावरणपूरक, नॉन टॉक्सिक, अ‍ॅन्टी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आणि वॉशेबल आहे. रंग केवळ चार तासांत वाळेल.

वैदिक पेंटमुळे पशुधन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात अंदाजे ५५ हजार रुपयांची वाढ होऊ शकते, असे गडकरी म्हणालेत. त्यांनी वैदिक पेंटच्या डब्याचे काही फोटोदेखील शेअर केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात खादी उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. पंतप्रधानांनी ‘वोकल फॉर लोकल’ची घोषणा दिल्यापासून सर्वत्र आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तू विकत घेण्याकडेही अनेकांचा कल वाढला आहे, हे उल्लेखनीय.

ही बातमी पण वाचा : येत्या दोन वर्षांत भारतातून टोलनाके हद्दपार होणार – गडकरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER