वाझेचा साथीदार रियाझ काझीला १६ एप्रिलपर्यंत NIA कोठडी

Riyaz Kazi - NIA

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ स्फोटके लावणे आणि मनसुख हिरेनच्या (Mansukh Hiren) हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करताना मुंबई पोलिसांना (Mumbai Police) अडचणी येत आहेत. या प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vaze) न्यायालयीन कोठडीत आहे, तर त्याचा साथीदार रियाज काझी यालाही १६ एप्रिलपर्यंत NIA कोठडी देण्यात आली आहे.

स्फोटकेप्रकरण आणि हत्या यात अडचणी वाढू लागताच संबंधित पोलिसांचे वरिष्ठांकडून निलंबन होणे आणि काही दिवसांनंतर त्यांना अटक होणे, असे चक्र सुरू आहे. आधी API पदावरुन सचिन वाझे निलंबन झाले. नंतर त्याला एनआयएने १३ मार्च रोजी अटक केली. अटक केल्यापासून पाच वेळा एनआयएने वाझेची कोठडी वाढवून घेतली. अखेर २७ दिवसांच्या एनआयए कोठडीनंतर सचिन वाझे याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. न्यायालयीन कोठडीसाठी तळोजा तुरुगांत नेण्याआधी सलग दोन दिवस वाझेची सीबीआय चौकशी झाली.

सचिन वाझे NIA कोठडीत असतानाच त्याचा सहकारी रियाझ काझी याचेही निलंबन झाले. आता रियाझ काझी १६ एप्रिलपर्यंत NIA कोठडीत आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन वाझेला आवश्यकता भासल्यास नियमानुसार पुन्हा NIA चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे.

वाझेला पोलीस दलातून निवृत्त झालेले चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनी मदत केली होती का, याचा तपास अद्यापही सुरू आहे. तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची सीबीआय चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button