भारतीय वंशाचे वैवेल रामकलावन सेशल्सचे राष्ट्रपती; बिहारमध्ये आनंदोत्सव

Vavel Ramakalavan

व्हिक्‍टोरिया : भारतीय वंशाचे, बिहारी वैवेल रामकलावन (Vavel Ramakalavan) यांची सेशल्सचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. वैवेल रामकलावन यांना  ५४ टक्के मते  मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी डॅनी फॉरे यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला.

वैवेल यांच्या पूर्वजांचे गाव बिहारमधील बरौली क्षेत्रातील परसौनी येथे आहे. त्यांच्या विजयामुळे येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैवेल रामकलावन यांचे पूर्वज सुमारे १३५ वर्षांपूर्वी मॉरिशसला गेले होते. असे गावकरी सांगतात. वैवेल रामकलावन दोन वर्षांपूर्वी गावी आले तेव्हा येथील मातीचा टिळा लावला होता व ‘मी गावकऱ्यांचे प्रेम कधीच विसरणार नाही’, असे म्हटले होते. मी पुन्हा येईन व तेव्हा राष्ट्राध्यक्ष बनून येईन, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता.

गावाचा एक पुत्र एका देशाचा राष्ट्रपती बनला असल्याने सर्व ग्रामस्थ उत्सव साजरा करत आहेत. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अमेरिकेत सुरू असलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदासाठी नशीब आजमावत आहेत. त्या निवडून आल्या तर अमेरिकेच्या इतिहासातला ऐतिहासिक विक्रम ठरणार आहे. मॉरिशस आणि इतर काही राष्ट्रांच्या प्रमुखपदीही भारतीय अथवा भारतीय वंशाच्या व्यक्ती निवडून आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER