वसमत: श्री 1008 चंद्रप्रभ पंचकल्याणक मुर्तीचे वसमत येथे जोरदार स्वागत

श्री 1008 चंद्रप्रभ पंचकल्याणक मुर्तीचे वसमत

वसमत(प्रतिनिधी): वसमत येथे दि.5 रोजी सकाळी इंदौर येथे प.पू.आचार्य श्री 108 विद्यासागर महाराजांच्या सासंघ सानिध्यात पंचकल्याणक झालेल्या 51 इंची श्री 1008 चंद्रप्रभ भगवंता च्या मूर्तीचे आगमन झाले . त्यानिमित्त सकाळी 7.30 वाजता काळंकाई, कौठा रोड येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. भगवान महावीर मंदिर, झेंडा चौक, महावीर चौक, बँक कॉलनी,भगवान चंद्रप्रभ मंदिर व्यंकटरमणा नगर नांदेड रोड या मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकी नंतर श्री 1008 चंद्रप्रभ दिगांबर जैन मंदिर,व्यंकटरमणा नगर,नांदेड रोड, वसमत येथे चंद्रप्रभ भगवंता च्या मूर्तीचा अभिषेक व पूजन करण्यात आले व त्यानंतर सौ.मृदुला सुभाषराव पुरजळकर यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले व मूर्ती दाता सनतकुमार यंबल , डेकोरेशन सजावट दाता अनिल विजयकुमार महाजन यावेळेस उपस्थित होते.

समाजाचे ज्येष्ठ नारायणरावजी गोरे, बाबजीराव पुरजळकर,गुलाबराव महाजन, सत्याविजय मामा अन्वेकर, बंसिलालजी अक्करबोटे,महेंद्रकुमार यंबल, गंगाधर महाजन. डॉ.विनोद सोवितकर.जुगलकिशोर अक्करबोटे, मयुर महाजन, सुरेंद्रकुमार वरवंटे,अजितकुमार यंबल,राजकुमार महाजन, सुभाषराव लोखंडे,जैनेंद्र लोखंडे, यशवंत दिपक, सनतकुमार यंबल, सुभाष यंबल, गिरीधर आडते,बालाजी पोफाळकर, पुष्पेन्द्र अक्करबोटे.शुभम महाजन.अभय महाजन. डॉ. प्रणिल कंधारकर,रमेश बुरसे, दिपक बुरसे,अंकित यंबल.मितेश यंबल,सुभाष पुरजळकर,डॉ. प्रशांत संघई.सचिन पंचवाटकर.अमित पंचवाटकर, धिरज अक्करबोटे,पंकज दोडल,प्रविण पोफाळकर,अनिल महाजन. गुलाबराव महाजन,महेंद्र सराफ, डॉ.महावीर पुरजळकर,नितीन लवांडे रिसोड,जयकुमार जगजीवन नांदेड, सौ सीमा पंचवाटकर, सौ. प्रज्ञा दिपक, सौ. प्रियंका यंबल. सौ. अभिलाषा यंबल. सौ तृप्ती आक्करबोटे, सो. कल्पना सोवितकर.सौ.सुरेखा संदीप वरवंटे,सौ.जयश्री पुरजळकर,सौ. सुरेखा अनंतराव संगवे नांदेड, सौ.दीपाली भागोराव वरवंटे पंचवाटकर व वसमत येथील सामाजिक कार्य करणारे संदीप वरवंटे व जैन युवा मंच पदाधिकारी.विश्वस्त मंडळ.जैन महिला मंडळ व जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.