वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण : राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार

मुंबई : नवी मुंबईतील वाशी टोलनाका (vashi-toll-agitation-case) तोडफोड प्रकरणी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरे आज (शनिवार) वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. सकाळी ११ वाजताच्या सुमारास राज ठाकरे कृष्णकुंज निवासस्थानावरून रवाना झाले आहेत.

राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर वाशी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

राज ठाकरे येणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम करण्याचं ठरवलं आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल, अशी आशा मनसैनिकांना वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER