पुण्यात वशाटोत्सव : शरद पवार, संजय राऊतांसह आव्हाड-मुंडेही राहणार उपस्थित

Sharad Pawar - Sanjay Raut - Jitendra Awhad - Dhananjay Munde

पुणे : पुण्यात (Pune) येत्या शनिवारी वशाटोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी वशाटोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde), कॉंग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वशाटोत्सवाचं आयोजन केलं आहे. वशाटोत्सव म्हणजे काही फक्त मांसाहारी मेजवानीचा कार्यक्रम नाही. तर तो वैचारिक मेजवानीचा कार्यक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यंदाच्या वशाटोत्सवाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

राज्यभरातील बहुजन विचारधारेला मानणाऱ्या तरुणांना एकत्रित आणून, त्यांच्या वैचारिक विश्वाला विधायक मार्गाने समृद्ध करण्याचे काम, करण्यासाठी वशाटोत्सवाचे आयोजन गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत असल्याचे नितीन यादव यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER