वास्को द गामानं भारताचा नवा मार्ग शोधला पण लुट करण्यासाठी !

Maharashtra Today

एककाळ होता जेव्हा भारताला सोन्याची चिमणी म्हणलं जायचं. भारतात त्या काळी सोने चांदी भरपुर मात्रेत असायचं. भारतीय मसल्यांकडे जगभरातील व्यापारी मौल्यवान संपत्तीच्या स्वरुपात पहायचे. या मसल्यांचा सुगंध हजारो किलोमीटर दुर अटलांटीक समुद्राच्या पार पोर्तुगालमध्ये दरवळायचा. युरोपीयन लोकांना भारतीय मसल्यांचा सुगंध आणि चवीने वेड लावलं होतं.

सिंकदरचं भारतावर आक्रमण

वास्को द गामा(Vasco da Gama) हा भारतात पाऊल ठेवणारा पहिला युरोपीयन होता. ज्याला मसाल्यांच्या सुगंधानं भारताकडं आकर्षित केलं होतं. तसं युरोपच्या पश्चिमेला असणाऱ्या पोर्तुगाल आणि भारतात खुप आधीपासून व्यापारी संबंध होते. इसवीसन पुर्ण ३२७ मध्ये सिकंदरनं भारतावर आक्रमण केलं होतं. भारतातील नैसर्गिक संपत्ती अफाट आहे याची त्याला जाणीव होती. त्या संपत्तीला स्वतःच्या नावे करण्यासाठी त्यानं आक्रमण केलं. भारतात त्याचा पराभव झाला. त्याला परत मायदेशी ही परतता आला नाही. या आक्रमणावरुन भारतीय संपदेवर अनेक राष्ट्रांची नजर होती ही बाब अधोरेखित होते.

यावरुन गोष्ट सिद्ध होते की जगाला भारताचे आकर्षण होते. इसवी सनानंतर अनेक परकीय आक्रमकांनी भारतावर आक्रमण केलं. भारताला लुटण्याचे प्रयत्न केले. भारताकडे जाणारे अनेक व्यापारी मार्ग त्यांनी शोधून काढले. त्या सर्वांचा उद्देश एकमेव होता तो म्हणजे भारताची लुट.(Vasco da Gama found a new way to India) आणि यातूनच त्यांना भारताच्या मसाला उत्पादन व्यवसायावर कब्जा करायचा होता. हे स्पष्ट होतं.

मसाल्यांच उत्पन्न

भारतात गंगेच्या किनारील सुपीक मैदानं शेतीसाठी उपयुक्त आहेत तर भारताच्या दक्षिणेतून मोठ्या प्रमाणात मसाल्यांचे उत्पादन घेता येतं. तसेच बंगालचं सुती कापड आणि ढाकाची मलमल युरोपात मोठ्या प्रमाणात विकली जायची तेव्हा बंगाल आणि ढाका हे भारताचंच क्षेत्र होतं. युरोपात काळी मिरीचा वापर मांस संरक्षित करण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी केला जातो. लवंग, दालचिनीचा वापर व्हेंटीलेशनसाठी व्हायचा. खोलीतील दुर्गंध दुर घालवण्यासाठी या मसाल्यांचा व्हायचा. कोचीन आणि मालाबार तटावर काळी मिरीचं उत्पन्न घेतलं जायचं. लवगं बंगाल खाडीच्या तटावर उत्पादीत केली जायची.

लुटेरा होता वास्को द गामा

वास्को द गामा ८ जुलै १४९७ मध्ये ४ जहाजांना घेऊन पहिल्यांदा समुद्री यात्रेवर निघाला. मोठ्या प्रवासानंतर अफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’वर पोहोचला. नंतर तो कालिकतवर आला. राजा जमोरिन सोबत मसाल्यांचा वापर केला. मसल्यांची एक खेप घेऊन मायदेशी परतला. पोर्तुगीजात त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. नंतर १५०२ मध्ये २० जहाजांचा ताफा घेऊन तो भारताकडे निघाला. त्यासोबत लुटेरे आणि सैनिकही होते. भारता आल्यानंतर त्यानं मोठ्या प्रमाणात लुटी केल्या. मसल्यांच्या व्यापारावर कब्जा केला. भारतात चौक्या स्थापन केल्या. १५११ पर्यंत पोर्तुगीचांनी भारता आणि श्रीलंकेच्या मालाबार तटावरील मसाला व्यापावर नियंत्रण प्रस्थापरित केलं. १६ व्या शतकात भारतीय मसाल्यांच्या व्यापारावर त्यानं एकाधिकार मिळवला. १६ व्या शतकात पोर्तुगीजच्या निम्म्याहून अधिकचं कर उत्पादन भारतीय मसाल्यांच्या विक्रीतून येत होतं. यात काळ्या मीरीला विशेषमहत्त्व होतं. या मसल्यांची खरेदी एका पारड्यात सोनं चांदी आणि एका पारड्यात काळीमीरी तोलावी अशी होत होती. इतिहासकारांच्यामते हजारो वर्षांपासून उपयोग केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button