उद्धव ठाकरेंच्या हस्ते आधी शिवबंधन, हितेंद्र ठाकूरांना भिडणाऱ्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Today

वसई : महाविकास आघाडीत पुन्हा पक्षांतराचे राजकारण सुरु झाले आहे. . वसईतील नेते विजय पाटील (Vijay Patil) यांनी शिवसेनेला धक्का देत पुन्हा काँग्रेसचा (Congress) झेंडा हाती धरला आहे . . बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात विजय पाटील यांनी गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवली होती.

शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांच्या उपस्थित विजय पाटलांनी काल पक्ष प्रवेश केला. विजय पाटील यांची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. विजय पाटील यांनी याआधी काँग्रेसचे राज्य सचिवपद भूषवले आहे. मात्र 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत सप्टेंबर 2019 मध्ये पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांना शिवसेनेत प्रवेश केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button