वसई-विरार महापालिका निवडणूक लवकरच; राजकीय पक्ष सज्ज

vasai-virar-municipal-corporation

मुंबई : वसई-विरार शहर महापालिकेत असलेल्या सदस्यांची मुदत मागील २८ जून २०२० रोजी संपुष्टात आली. त्यानंतर राज्य सरकारने महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. मात्र आता महापालिका निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात शुक्रवार, ११ स्टेंबर रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा असलेल्या प्रभाग रचनांवर हरकती आणि सूचनांची सुनावणी होणार आहे.

कोरोनाचे (Corona) संकट ओढवल्यामुळे वसई-विरार महापालिकेवर प्रशासक नियुक्तीबरोबर येथील निवडणूक पुढे ढवलण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर महापालिकेवर २९ जूनपासून प्रशासक म्हणून आयुक्त गंगाथरन डी. हेच काम पाहात आहेत. महापालिका निवडणुकीच्या सूचनांची सुनावणी प्रलंबित राहिली होती. परंतु आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील संभाव्य महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यातील प्रभाग रचना व त्यावरील हरकतीबाबत सुनावणीचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात प्रभागाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यावेळी जाहीर झालेल्या आरक्षणावर हरकती घेण्यात आल्या होत्या. परंतु प्रभाग रचना संदर्भातील हरकती आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यावर सुनावणी झाली नव्हती.

राजकीय पक्ष सज्ज

मार्च महिन्यात काढलेल्या प्रभागाचे आरक्षण सोडतीवर शुक्रवारी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या विरार स्थित स्थायी समितीच्या सभागृहात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. कोरोना नियमावलीचे पालन करून सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER