वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकतींवर आज सुनावणी ;२९ गावांचा प्रश्न रखडला

Vasai - Virar Municipal Corporation

मुंबई : वसई-विरार महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी २९ गावे वगळण्याचा निर्णय अद्यापही रखडलेला आहे . कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मार्चमध्ये होणारी अंतिम सुनावणी करोनामुळे लांबणीवर पडली.

पालिकेने गावे वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका चुकीची असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. तसे झाल्यास सुनावणी न होताच गावे वगळण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी पालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी होणार आहे. २९ गावांचा मुद्दा प्रलंबित असल्याने प्रभाग रचनेवरच आक्षेप घेण्यात आला आहे.

वसई-विरार पालिकेतून २९ गावे वगळण्याचा प्रश्न गेली दहा वर्षे प्रलंबित आहे. राज्य शासनाने गावे वगळण्याच्या काढलेल्या अधिसूचनेला पालिकेने आव्हान दिले होते. मात्र, आव्हान देणारी याचिका चुकीची असल्याने ती बरखास्त करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

गावे वगळण्यासाठी शिवसेनेचे (Shiv Sena) विजय पाटील (Vijay Patil), काँग्रेसचे (Congress) जिमी घोन्साल्विस आणि निर्भय जनमंचचे मनवेल तुस्कानो हे न्यायालयात लढा देत आहे. आता वसई-विरार महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून गावे वगळण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

शुक्रवारी पालिकेच्या प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकतींवर सुनावणी होणार आहे. त्यावेळी आम्ही गावे वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी पालिकेची याचिका तांत्रिकदृष्टय़ा चुकीचे असल्याने ती रद्द करावी अशी मागणी करणार असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER