वसई-विरारला पाण्याची चिंता नाही; धरणात मुबलक साठा

Dhamni Dam

वसई : वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी धरणात (Dhamni Dam) मुबलक पाणीसाठा असल्याने वसईकरांना पाणीटंचाई भेडसावणार नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या योजनेच्या धामणी धरणात किमान २८० दिवस पुरेल इतके पाणी आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. सध्या शहराला सूर्या पाणी प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २०० दशलक्ष लिटर्स, पेल्हार धरणातून १० दशलक्ष लिटर्स आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स एवढा पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या पालिकेच्या क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात २५.२९ टक्के इतका आहे. हा साठा २८० दिवस पुरेल एवढा आहे. पेल्हार धरणात ३१. ०४ टक्के पाणी साठा शिल्लक असून तो ७० दिवस पुरू शकेल. उसगाव धरणात २१.९१ टक्के असा पाणीसाठा असून तो ४० दिवस पुरू शकणार आहे. यामुळे यंदा पाऊस जरी लांबला तरी पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार नाही. या तिन्ही धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे त्याचे योग्य नियोजन करून पाणी वसई-विरार शहराला पुरविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button