वरुण धवन, कृती सेनन पाच वर्षानी पुन्हा एकत्र

Varun-Kriti

2018 मध्ये ‘स्त्री’ चित्रपटातून प्रेक्षकांना एका वेगळ्या हॉरर जॉनरनने थक्क करणारा दिग्दर्शक अमर कौशिक आता आणखी एक असाच वेगळा चित्रपट घेऊन येत आहे. भुतांना विनोदी रुपात सादर करणाऱ्या या हॉरर कॉमेडी चित्रपटातील मुख्य भूमिकासांठी वरुण धवन (Varun Dhawan) आणि कृती सेनन (Kriti Sanon) यांची निवड केल्याचे समजते. चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक ‘भेड़िया’ असे ठेवण्यात आलेले आहे. चित्रपटाच्या कथेबाबत मात्र प्रचंड गुप्तता बाळगली जात असल्याने त्याबाबत काहीही माहिती उपलब्ध झाली नाही. दिनेश विजन प्रस्तुत या चित्रपटाची कथा नीरेन भट्टने लिहिली असून जानेवारी 2021 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाणार आहे.

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टी (Rohit Shetti) दिग्दर्शित शाहरुख आणि काजोल अभिनीत ‘दिलवाले’ चित्रपटात वरुण आणि कृतीची जो़डी सर्वप्रथम एकत्र आली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त कृती लक्ष्मण उतेकर यांच्या ‘मिमी’ चित्रपटात काम करीत असून अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ मध्येही ती दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER