
बॉलिवुडमध्ये (Bollywood) कलाकारांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागल्याचे दिसत आहे. करण जोहर निर्मित ‘जुग जुग जियो’चे चंडीगढमध्ये शूटिंग सुरु असताना अभिनेत्री डिंपल कपाडियाला (Dimple Kapadia) आणि दिग्दर्शक राज मेहताला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यांच्यासोबत अभिनेता वरुण धवनलाही कोरोनाची लागण झाली आहे. वरुणला (Varun Dhawan) कोरोनाची (Corona) लागण झाल्याचे समोर येते की नाही तोपर्यंत अभिनेत्री कृती सेननलाही (Kriti Sanon) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
स्वतः वरुणनेच सोशल मीडियावर त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. वरुणने सोशल मीडियावर म्हटले आहे की, मी जेव्हा शूटिंगवरून परत आलो तेव्हा मी कोरोना पॉझिटिव्ह होतो. खरे तर सेटवर प्रॉडक्शन टीमने कोरोनाबाबत सगळे सुरक्षा उपाय केले होते. परंतु जीवनात काहीही निश्चित नसते. विशेषतः कोविड 19 बाबत. त्यामुळे सगळ्यांनी सुरक्षित राहावे. मला असे वाटते की, मी अजून सावध राहू शकलो असतो. गेट वेल सूनचे मेसेज मी पाहात आहे. त्याबाबत धन्यवाद.
वरुणच्या या मेसेजवर बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या असून अभिषेक बच्चनने, काळजी घे आणि लवकर बरा हो असा मेसेज दिला आहे. यासोबतच सिद्धांत चतुर्वेदी, सोफी चौधरी, मौनी रॉय, दब्बू रत्नानी, नुसरत भरूचा यांनीही वरुणला लवकर बरे होण्यासाठी मेसेज केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला