वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण ; संजय राऊत यांनाही चाचणी करावी लागणार, राऊत-पवार भेटीमुळे टेन्शन वाढले

Maharashtra Today

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Sanjay Raut) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे . गेल्या दोन दिवसांपासून त्यांंना कोरोनाची लक्षणं दिसत होती. अखेर चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने आता संजय राऊत यांनाही कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.

संजय राऊत यांनी नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली होती. त्यामुळे आता संजय राऊत यांनाही कोरोनाची लागण झाली असेल तर शरद पवार यांचे काय, अशी भीती अनेकांना सतावत आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून वर्षा संजय राऊत यांना ताप, सर्दी खोकला होता. कोरोनाची लक्षणे असल्याचं समोर आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. ही चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतल्या फोर्टीस रुग्णालयात दाखल केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button