वर्षा राऊत पीएमसी बँक घोटाळा : राऊतांच्या जवळचे प्रवीण राऊतांची संपत्ती ईडीने केली जप्त

Praveen Raut

मुंबई : पीएमसी बँक घोटाळा (PMC Bank scam) प्रकरणात, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांची पत्नी वर्षा आणि संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीप्रकरणी वर्षा यांना ईडीने (ED)नोटीस बजावली आहे.

आता ईडीने प्रवीण यांची ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.पीएमसी बँक घोटाळ्याची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू आहे. या चौकशीसंदर्भात ईडीने प्रवीण राऊत यांना समन्स बजावत चौकशी केली होती. काही दिवसांपूर्वी ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली होती. आता ईडीने त्यांची ७२ कोटींची संपत्ती जप्त केली.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये झाल्याची माहिती आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER