वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर, चौकशीला सुरूवात

मुंबई :- शिवसेनेचे (Shivsena) दिग्गज नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनी आज दुपश्री तीन वाजता ईडी (ED) कार्यालयात हजेरी लावली. मिळालेल्या माहितीनुसार पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आलं होत. २९ डिसेंबरला त्यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं. मात्र ईडी कार्यालयात उपस्थित राहणं शक्य नसल्याचे म्हणत वर्षा राऊत यांनी आणखी काही दिवसांचा अवधी त्यांनी ईडीकडे मागितला होता. त्यानंतर ईडीने त्यांना उद्या म्हणजेच ५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र वर्षा राऊत यांनी एकदिवसापूर्वीच ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत.

खरंतर वर्षा राऊत याना उद्या ईडीच्या कार्यालयात हजर व्हायचे होते. मी, मात्र शिवसैनिकांकडून होणारी संभाव्य गर्दी आणि प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी राऊत या आजच ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. आत काही तास त्यांची चौकशी होणार असून, त्यांना उद्या परत बोलावले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी पण वाचा : वर्षा राऊत पीएमसी बँक घोटाळा : राऊतांच्या जवळचे प्रवीण राऊतांची संपत्ती ईडीने केली जप्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER