यंदा मलेरीया आणि डेंग्युच्या रुग्णात घट

Thane Municipal Corporation Dengue

ठाणे :- पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणो महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाय योजना करण्यात येत असतात. तरीही ठाण्यातील आरोग्यावर दरवर्षी महासभेत चिरफाड होत असते. मागील 9 वर्षात आरोग्याचा प्रश्न गंभीर होत जात असला तरी डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत यंदा घट झाल्याचे आढळून आले आहे. यंदा महापालिका हद्दीत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 114 होती. हीच संख्या 2015 मध्ये 470 एवढी आढळून आली होती. तर मलेरीयाच्या रुग्णांची संख्या यंदा 382 एवढी आढळून आली आहे.

ठाण्यातील रस्त्यांवर वाढतोय वाहनांचा भार

ठाणोकरांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ठाणो महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाय योजना केल्या जातात. मान्सूनच्या काळात उद्भवणा:या साथरोगांचा सामना करण्यासाठी ठाणो महापालिकेचे आरोग्य विभाग सज्ज झाला असून, फायलेरीया विभागाचे 210 अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि प्रत्येक आरोग्य केंद्रातील 150 कर्मचा:यांचा स्टाफ पावसाळ्यात विशेष लक्ष ठेवून असतात. एखाद्या ठिकाणी साथरोगांचा फैलाव वाढू लागला तर त्या भागात जाऊन आरोग्य केंद्रातील कर्मचारी हे प्रत्येकाचे रक्त नमुने तपासणार असून, त्याच ठिकाणी उपचार करणार आहेत. याशिवाय दिड लाख भित्ती पत्रके तयार करण्यात येऊन ती वाटप करण्यात आली होती.

विकासकांच्या कामांच्या ठिकाणी देखील रखबदारी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच ज्या विकसकांची नव्याने कामे सुरु आहेत, त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. याशिवाय घरोघरी जाऊन पाण्याचे नमुने तपासणो, जनजागृती करणो, आदींचे कामही या माध्यमातून केले गेले. तसेच मच्छरांची पैदास वाढू नये म्हणून खाजगी आणि सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी पाईपला नायलॉन जाळ्या बसविणो आदींचे कामही केली होते. याशिवाय इतर उपाय योजना देखील आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. त्यामुळेच यंदा साथरोगांची जास्त समस्या ठाण्यात आढळून आली नसल्याचे दिसत आहे. शहरात यंदाच्या वर्षात डेंग्युचे 114 रुग्ण आढळले आहेत. तर मलेरीयाचे 382 रुग्ण आढळले आहेत. तर हत्तीरोगाचे 11 रुग्ण आढळले आहेत.