राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपर्क कार्यालयात भाजपचा झेंडा नसल्याने राजकीय वर्तुळाच चर्चांना सुरुवात

vikhe patil

शिर्डी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपात प्रवेश घेतलेले अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. मात्र कार्यक्रमात कुठेलही भाजपचा झेंडा दिसला नाही तर त्यांच्या कार्यालयातून तो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

विखे पाटल यांनी स्वत: कार्यालयाचे उद्घाटन केले. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्या गोटात सामील झाले होते. भाजपच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी मिळवली होती. मात्र, राज्यात भाजपाची सत्ता न आल्याने कदाचित त्यांचा हिरमोड झाला आहे.

विखे पाटलांचे कार्यकर्ते त्यानी केलेल्या पक्षबदलानंतर अजूनही काँग्रेस किंवा इतर पक्षात आहेत. कदाचित त्यामुळेच श्रीरामपूर येथील संपर्क कार्यालयाला ‘राधाकृष्ण विखे पाटील संपर्क कार्यालय’ असे टायटल देण्यात आले आहे. ज्यामुळे कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिथे येण्यास अडचण होणार नाही. मात्र, हेच कारण आहे की अन्य काही..? त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील खरंच भाजपपासून दूर चालले आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे.

विखे पाटील शिवसेनेत जाण्याची शक्यता; भाजपासाठी ठरणार मोठा धक्का

श्रीरामपूर येथील स्थानिक राजकारण बघितले तर मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र आहे. विखे समर्थक असलेले ससाणे थोरातांच्या जवळ गेले आहेत. तर काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत दाखल झाले आहेत. नगरपालिका, बाजार समिती, पंचायत समितीसह अनेक गावात विखे पाटील समर्थक पदाधिकारी आहेत.

दरम्यान, श्रीरामपूर येथील कार्यालयात लावलेल्या एका बॅनरवरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. विखे पाटील नेमके कोणत्या नव्या रस्त्याच्या शोधात आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.