Varicose veins – काळजी व चिकित्सा

Varicose Veines

अनेक जणांना पायावरील शिरा ताठरलेल्या दिसतात. रक्त वाहिन्यांचे जाळे स्पष्ट झालेले दिसून येतात. पायावर कधी कधी सूज आलेली दिसते. प्रवास केल्यानंतर किंवा जास्त वेळ उभे राहिल्यास पाय दुखणे, रक्ताच्या गुठळ्या झाल्याप्रमाणे पाय किंवा मांड्यावरील शिरा ( रक्त वहिन्या) दिसायला लागतात. ही सर्व लक्षणं varicose veins आजारात दिसून येतात. रक्त वहिन्यांचे ताण वाढून त्यातील व्हॉल्व निकामी होऊ लागतात त्यामुळे गुरुत्त्वाकर्षणाने या शिरांमधे हळुहळू रक्त जमा होऊ लागते. कधी पाय काळे सुद्धा पडलेले दिसतात. जखमा झाल्यास लवकर भरून येत नाही.

Varicose veins आजाराची कारणे बघूया –

  • लठ्ठ व्यक्तींमधे अधिक प्रमाणात आढळून येते.
  • सतत व अनेक तास उभे राहण्याचे काम असणारे उदा. कंडक्टर, शिक्षक इ.
  • अव्यायाम / अति व्यायाम.
  • अभ्यंग न करणे.
  • गर्भारपण.
  • अतिकृश व्यक्ती मूळव्याध, मलावष्टंभ असणे.
  • रक्त वाहिन्यांमधे गुठळ्या असणे.
  • रक्तविकार, पित्त विकार असणे.
  • अशी विविध कारणे या आजाराची असू शकतात.

या आजारात विशेष काळजी सुरवातीपासूनच घेणे गरजेचे आहे. एकाच स्थितीत जास्त वेळ न बसणे. अधिक काळ उभे न राहणे. पायाचा व्यायाम करणे. रोज झोपतांना पायाखाली उशी घेणे जेणेकरून दाब कमी होईल. मुख्यतः तेलाने रोज उर्ध्व दिशेने मालीश करणे.

काही आसन या व्याधीत उपयोगी पडतात. उदा. उत्तानपादासन, पवनमुक्तासन, पश्चिमोत्तासन रक्तमोक्षण, बस्ति पंचकर्म चिकित्सा यावर खूप उपयोगी ठरते. लेप अभ्यंग षष्ठीशाली पिंड स्वेदसारख्या बाह्य चिकित्सा varicose veins मधे केल्या जातात. स्थूलता असल्यास वजन कमी करणे, अतिकृश असल्यास बृंहण चिकित्सा केल्याने हा आजार बरा होऊ शकतो. आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार नक्कीच फायदेशीर ठरतो. आहारात अति तिखट मसालेदार पदार्थ सेवन न करणे. गाईचे तूप आहारात घेणे. पथ्यकर पदार्थ घेणे आवश्यक आहे.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER