शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वरात काढली ट्रॅक्टरवर !

- लग्नानंतर नवदांपत्य जाणार आंदोलनात

Varat on a tractor

हरियाणा : केंद्राच्या शेती कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हरयाणातील कर्नालचा सुमित हा युवक त्याच्या लग्नाची वरात ट्रॅक्टरवरून नवरीच्या घरी नेणार आहे!

सेक्टर ६ कर्नाल येथील सुमित धुल्ल यांने वरातीसाठी सजवलेली मर्सिडीज (Mercedes) गाडी घरी ठेवली होती. पण अशेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी, वरात नेण्याकरता त्याने ट्रॅक्टर काढले!

सुमित म्हणाला, मी शेतकरी कुटुंबातला आहे. शेतकऱ्यांना माझा पाठिंबा दर्शवायचा आहे म्हणून वरात ट्रॅक्टरवरून नेणार आहे. आम्ही सगळे आता शहराच्या दिशेनी धावत असलो तरीही आमचे मूळ शेतीतच आहे. आमच्यासाठी प्रथम प्राधान्य शेतीलाच आहे.

सुमितचे मामा सुरिंदर नरवाल यांनी सांगितले की, नवरीकडे जाण्यासाठी आम्ही एका सजवलेल्या गाडीची व्यवस्था केली. परंतु शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सुमितीने लग्नाच्या ठिकाणी जाण्याचे वाहन म्हणून मर्सिडीज गाडी न घेता ट्रॅक्टर घेण्याचा आग्रह धरला. हा शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सुमित आणि त्याची पत्नी लग्नानंतर दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाच्या ठिकाणी जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER