‘गाव तिथे बार’ची घोषणा देऊन निवडणूक लढवणाऱ्या वनिता राऊत यांनी चंद्रपूरची दारूबंदी हटवण्याचे केले स्वागत

चंद्रपूर : दारूबंदीचा (liquor ban) खुला विरोध करून २०१९ मध्ये चिमूर येथून विधानसभेची निवडणूक लढवून खळबळ उडवून देणाऱ्या वनिता राऊत (Vanita Raut) यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. वनिता यांनी, आमदार झाले तर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवणार, गाव तिथे बार सुरू करणार आणि दारिद्र्यरेषेखालील लोकांना स्वस्तात दारू देणार, अशी भन्नाट आश्वासने दिली होती. मात्र, त्यांना फक्त २८६ मते मिळाली होती. मात्र, त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्याला राज्यभर दणकून प्रसिद्धी मिळाली होती. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय झाला. या निर्णयाचं समर्थन आणि विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर तर याचा पाऊसच पडला.

याबाबत प्रतिक्रिया देताना वनिता राऊत यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि सरकारने माझा जाहीरनामा अमलात आणावा, अशी विंनती केली. वनिता यांचे म्हणणे आहे की, लोकांना सोय व्हावी म्हणून ५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात बार सुरू केला पाहिजे. दारू विकणारा आणि पिणारा या दोघांकडे पण परवाना असला पाहिजे. २५ वर्षांच्या खालील लोकांसाठी दारूबंदी असावी. सरकारने या कायद्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे.

जाहीरनामा
वनिता राऊत यांनी जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते की, निवडून आल्यास गडचिरोलीतील दारूबंदी हटवेन. बेरोजगारी कमी करण्यासाठी तरुणांना दारू विकण्याचे परवाने देईन. दारिद्र्यरेषेखाली लोकांना दारूच्या किमतीत सूट देऊ, गाव तिथे बार सुरू करू आणि ‘गाव तिथे बार’ योजना राज्यभरात सुरू करावी यासाठी प्रयत्न करेन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button