वाणीला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा

‘शमशेरा’ आणि ‘चंडीगढ करे आशिकी’ हे चित्रपटदेखील आहेत रांगेत

Vani Kapoor

अक्षयकुमारच्या (Akshay Kumar) ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या होळीच्या रिलीज होण्याच्या तारखेपासून पुढे गेल्यानंतर मुंबई चित्रपटसृष्टीत त्याच्या इतर चित्रपटांबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अक्षयच्या ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) चित्रपटाचे निर्मातेही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. या सर्व चर्चेच्या दरम्यान ‘बेल बॉटम’ चित्रपटाची नायिका वाणी कपूर सांगते की, फक्त एवढेच नव्हे तर त्याचे बाकीचे चित्रपटही थिएटरसाठी बनविलेले आहेत. त्यांचे चित्रपट लवकरच प्रदर्शित होतील आणि प्रेक्षक नक्कीच ते पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वाणी कपूरचे (Vani Kapoor) सन २०२१ मध्ये ‘शमशेरा’, ‘बेल बॉटम’ आणि ‘चंदीगढ करे आशिकी’ हे तीन चित्रपट पूर्ण झाले आहेत.

तिन्ही चित्रपटांच्या कथा वेगळ्या आहेत आणि तिच्या करिअरच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर तिला या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकादेखील मिळाल्याचा वाणीला आनंद आहे. ती म्हणते, “प्रेक्षक जेव्हा थिएटरमध्ये हे चित्रपट पाहतील तेव्हा मी उत्सुकतेने वाट पाहात असेल; कारण हे चित्रपट त्यांचे उत्तम मनोरंजन करतील.” या तीन सिनेमांमध्ये वाणी कपूर हिंदी सिनेमाच्या तीन मोठ्या स्टार्ससोबत काम करत आहे. ती शमशेरच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहात आहे; कारण या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत आहे. ती ‘बेलबॉटम’मधील अक्षयकुमार आणि ‘चंडीगढ करे आशिकी’मध्ये आयुष्मान खुरानाच्या प्रेमिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. वाणी म्हणाली, “मला आशा आहे की, हे वर्ष एका मोठ्या पडद्यावर धमाल करेल.” लोक व्हायरस नियंत्रणाखाली येण्याची वाट पाहात आहेत आणि लसीमुळे लोकांचा आत्मविश्वास हळूहळू वाढेल. ते पुन्हा सुरळीत जीवन सुरू करतील. लोकांना जगताना कमतरता जाणवत आहे.

आपला समाज सामुदायिक कार्यक्रमांना दाद देतो आहे. सामुदायिक उत्सव लवकरच भव्य प्रमाणात सुरू होतील; कारण भारतीयांसाठी कुटुंब आणि मित्रांसह नाट्यगृहात जाणे आणि चित्रपट पाहणे ही मोठी गोष्ट आहे.” लोकांना पुन्हा चित्रपटगृहात आणण्यात नवीन आणि वेगळी कन्टेन्ट मोठी भूमिका बजावेल, असा वाणीला विश्वास आहे. कोरोना साथीच्या काळात लोकांच्या आवडीमध्ये बदल झाला आहे, असे वाणीदेखील मानते. “प्रेक्षकांना आता नवीन, ताजे चित्रपट पाहायचे आहेत. कोरोनामुळे लोकांची आवड बदलली आहे आणि जेव्हा त्यांना चमकदार, नवीन आणि प्रभावी अशी एखादी कहाणी बघायला मिळेल तेव्हाच त्यांना थिएटरमध्ये यावेसे वाटेल. माझा विश्वास आहे की, या कारणांमुळे माझे आगामी चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणतील, असे वाणी म्हणाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER