‘दुर्लक्षित हिरो’ विनोद जांगिड यांचा सत्कार

Maharashtra Today

अंबरनाथ : १७ एप्रिल रोजी उद्यान एक्सप्रेस पुण्याहून मुंबईकडे येत असताना मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर सात वर्षांचा एक बालक रुळावर पडला. रेल्वे पॉईंट्समन मयूर शेळके (Mayur-shelke)यांनी प्रसंगावधान दाखवत जिवाजी बाजी लावून त्या बालकाचा जीव वाचवला. या गाडीचे चालक विनोद जांगिड यांनी त्यावेळी तातडीने गाडीचा वेग कमी केल्याने बालकाला वाचवण्यासाठी शेळके यांना चार सेकंड जास्त मिळाल्याने अनर्थ टळला. यासाठी विनोद जांगिडयांचा महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

त्यादिवशी उद्यान एक्सप्रेस नेहमीच्या तासी १०५ किलोमीटर वेगाने वांगणी रेल्वे स्थानकाकडे येत असताना चालक विनोद जांगिड(Vinad Jangid) यांना एक बालक स्थानकात रुळांवर पडलेला दिसला. विनोद यांनी आपत्कालीन ब्रेक दाबून गाडीचा वेग ८० किलोमीटरपर्यंत कमी केला. त्या बालकाची आई अंध असल्याने ती मुलाला वाचवण्यासाठी काहीही करण्यास असमर्थ होती. कुणीतरी मुलाला वाचवा म्हणून आकांत करत होती. मयूर शेळके यांनी यांनी जीवाची बाजी लावून त्या बालकाला वाचवले. यासाठी त्यांचे योग्य असे कौतुक झाले पण, यात गाडीचे चालक विनोद यांनी गाडीचा वेग कमी केल्याने हे साध्य झाले, ही बाजू मागे पडली होती. आज १ मे रोजी याची भरपाई झाली. विनोद यांचाही त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल सत्कार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button