बाबासाहेबांच्या राजगृहावर तोडफोड; राष्ट्रवादी आक्रमक

Jitendra Awhad - Dhananjay Munde - Rajgruh

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’वर मंगळवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. निवसस्थानाची तोडफोड केली या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी

‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान ‘राजगृह’ ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.’ या प्रकरणी माथेफिरूवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून केली आहे.

तर, आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई तातडीनं करण्याची मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER