मराठा आरक्षणाला वंचितचे समर्थन; १० तारखेच्या बंदला पाठिंबा- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambhedkar

पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्च्याला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामंजस्य बिघडू नये म्हणून आपण येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी मला १० तारखेच्या मोर्च्याला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. या प्रश्नावरून मराठा संघटनांमध्ये वेगवेगळे गट निर्माण होण्याची शक्यता आहे. यापैकी काही जण भविष्यात आक्रमक भूमिका घेऊ शकतात. परिणामी राज्यातील सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची दक्षता घेतली जावी. दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनाही फटकारले. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळत “एक राजा बिनडोक आहे.” असं आंबेडकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER