‘वंचितची’ १३ मार्चला एनआरसी, सीएएविरोधात परिषद

Prakash Ambedkar

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी भटके विमुक्त अदिवासी समन्वय समितीच्या वतीने १३ मार्च रोजी सीएए व एनआरसीविरोधात नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे अदिवासी भटक्या विमुक्तांची परिषद होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे व भटके विमुक्त अदिवासी समन्वयक समितीचे राज्य समन्वयक प्रा. किसन चव्हाण यांनी येथे शनिवारी (दि. २९) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी प्रा. विष्णू जाधव, वंचित बहुजन आघाडीचे व भटके विमुक्त अदिवासी समन्वय समितीचे सदस्य अरूण जाधव, दिनेश साळवे, भरत दाभाडे, अशोक जाधव, श्रीरंग ससाणे, योगेश बन, प्रभाकर बखले, नितन सोनवणे, गौतम गणराज यांनी प्रमुख उपस्थिती होती.

देशातल्या संविधानानेच अदिवासी, भटक्या विमुक्तांना जन्मापूर्वीच देशाचे नागरीकत्व दिले आहे, यासाठी हा संविधानविरोधी कायदा रद्द करावा, कायद्यातील तीव्र विरोध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी अदिवासी, भटक्या, विमुक्तांसाठी काम करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते यांनी परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेनंतर पुढच्या टप्प्यात गाव, वाड्या-वस्त्या, तांडे, पांड्यावर जाऊन हे कार्यकर्ते जनजागृती करणार असल्याचे प्रा. चव्हाण यांनी सांगितले.

भाजपला संधी द्या , शहराचे चित्रच बदलून दाखवतो : चंद्रकांत पाटील