वंचित आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Prakash Ambedkar

मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मागासवर्गीय, बौद्ध व भटक्या जमाती लोकांवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या घटनांप्रकरणी जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. उद्या (१७ जून) रोजी आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलरवर देण्यात आली आहे.

राज्यात मागास जातीतील व्यक्तींवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटवरून त्याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. “जगामध्ये करोनाचं संकट उद्धभवलेलं आहे. जनजीवन ठप्प झालं आहे. अशातच महाराष्ट्रात मागासवर्गीय, बौद्ध, भटक्यांवरील अत्याचारानं कळस गाठला आहे. वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, महिला आघाडी आदी १७ जून रोजी शहर, तालुका व जिल्हास्तरावर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला निवेदन देणार आहे. त्यानंतर प्रत्येक तीन दिवसांनी जाब विचारणार आहे,” असं निवेदनात नमूद केल्या गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER