वंचित बहुजन आघाडी आणि भाजपला धक्का, अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत

Deprived Bahujan Alliance and BJP push

मुंबई :- २०१४ नंतर राज्य आणि केंद्रात भाजपने स्थापन केल आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्ते भाजपमध्ये गेले होते. मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर भाजपमधून आऊटगोईंग सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीला देखील खिंडार पाडलं आहे.

वंचित बहुजन आघाडीतील गणेश जाधव, सुधीर आंब्रे, ज्योती कांबळे, प्रकाश यादव, दीपक तांबे, रेखा मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश केलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामाजिक न्याय विभागात काम करणार आहेत. यासोबतच, चांदणी मुन्नी अन्सारी यांनी पक्षाच्या एलजिबीटी सेलमध्ये प्रवेश केला.

तर दुसरीकडे आज पालघर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER