वंचितचे आंदोलन यशस्वी; सरकारकडून मंदिरे खुली करण्याचे आश्वासन- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

पंढरपूर : राज्यभरातील धार्मिक स्थळे भाविकासांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून पंढरपुरात आंदोलन करण्यात आले. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंबेडकर यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता प्रशासनाने आज आंबेडकरांसह १५ जणांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली.

Image may contain: 5 people, people standing and outdoorलवकरात लवकर लोकांसाठी मंदिर(Mandir), मशीद, बुद्धविहार, जैन मंदिर सुरू केली जातील. त्यासाठी सरकारकडून  नियमावली तयार केली जात आहे, अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली. आठ ते दहा दिवसांत ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरू होतील, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या  कार्यकर्त्यांचे  पंढरपुरात आंदोलन अखेर संपले. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर आणि शिष्टमंडळाने दरवाजातून विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले.

ते म्हणाले की, मी दर्शन घेतलं. १५ जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आलं. मंंदिरं खुली (Open Temple) करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला.  त्याबद्दल त्यांचे आभार. आपण आठ दिवस थांबू, वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं, असं आपण समजू या, असं आंबेडकर म्हणाले. लोकभावनेचा आदर केला त्याबद्दल सरकारचे आभार, असंही ते म्हणाले. मी म्हणालो, तुम्ही घोषणा करा, अन्यथा लोक मला मारतील.

मात्र आम्ही करणारच, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. जे निर्णय शासनाने घेतले पाहिजे, ते सर्वसामान्य लोक घेत आहेत. दुर्दैवाने लोक हा निर्णय घेत आहेत आणि सरकारला तुम्ही हा निर्णय घ्या, असे सांगत आहेत. १० दिवसांत आदेश आले नाही तर पुन्हा पंढरपुरात येणार, असंदेखील आंबेडकर म्हणाले.

ह्या बातम्या पण वाचा : 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER