राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजी नाही : खा.वंदना चव्हाण

NCP

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये आमदार, खासदार, प्रवक्ता, शहर अध्यक्ष, वेगवेगळ्या सेलची प्रमुख पदे ही फक्त मराठा समाजाला दिली जात आहेत, असा आरोप करणारे एक निनावी पत्र व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

यावरून अनेक तर्क-वितर्क काढण्यात आले . हे प्रकार पक्षांतर्गत असलेल्या वादामुळे चव्हाट्यावर येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र राष्ट्रवादी पक्षात अशी कुठलीही गटबाजी नाही. सर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन पदे दिली जात असतात. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे आहे. तरी यामध्ये काही चुकीचे असेल तर सुधारणा होईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिले.

शहर राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेच्या नियुक्तीवर आक्षेप घेणारे पत्र सध्या व्हायरल झाले आहे. पक्ष संघटनेत ८० टक्के मराठा समाजाला स्थान देण्यात आल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील खदखद बाहेर आली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने हे सर्व फेटाळले असून पक्षात गटबाजी नसल्याचे सांगण्याची वेळ नेत्यांवर आली आहे.