व्हॅलेंटाईन वीकला झाली सुरुवात

Valentine's week

नवी दिल्ली : काल रविवारपासून व्हॅलेंटाईन वीकला (Valentine week) सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी रोझ डे सेलिब्रेट करण्यात आला. सध्या सिनिअर कॉलेज बंद असली तरी तरुण आणि तरुणींमध्ये व्हॅलेंटाईन वीकची क्रेझ पाहायला मिळत असून, बाजारपेठेतील दुकानेही गिफ्ट विक्रीसाठी सज्ज झाली आहेत.

फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर प्रेमीयुगुल ‘ व्हॅलेंटाईन डे’सह ‘व्हॅलेंटाईन वीक’चीसुद्धा आतुरतेने वाट पाहतात. दि. ७ फ्रेबुवारीपासून ते १४ फेब्रुवारीपर्यंत ‘व्हॅलेंटाईन वीक’ साजरा केला जातो. ‘रोझ डे’पासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली. गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच व्हॅलेंटाईन वीकची या दिवसापासून सुरुवात होते, असे म्हटले जाते. रविवारी रोझ डे साजरा करण्यात आला. या दिवशी अनेकांनी एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त केले. हा दिवस साजरा करण्यामागे असेही सांगितले जाते की, महाराणी व्हिटोरियाच्या काळात आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लोकांनी एकमेकांना लाल गुलाब देण्याची परंपरा सुरू केली. त्यामुळे गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले. केवळ कपलच नव्हे तर मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्यदेखील केवळ आनंद, मौज म्हणून व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात. दि.७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे अशा पद्धतीने हा आठवडा साजरा केला जातो. सध्या कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र, वरिष्ठ महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. यंदा कोरोनामुळे उत्साहावर मर्यादा आल्या आहेत. तरीही या डेचा आनंद मात्र लुटला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER