अखेर लोकप्रिय गायिका वैशाली माडेंच्या हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ

Vaishali Made

मुंबई : बॉलिवूडमध्येही (Bollywood news) आपल्या आवाजाची जादू दाखवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका ३१ मार्चला वैशाली माडे (Vaishali Made) यांचा राष्ट्रवादीत (NCP) पक्षप्रवेश होणार होता. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार होते. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणामुळे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. परंतु वैशाली माडे हिने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वैशाली माडे यांची जयंत पाटील यांच्या निर्देशांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वैशाली माडे हिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छासुद्धा देण्यात आल्या. यापूर्वीदेखील अनेक मराठी कलाकारांनी आपल्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा घेतला आहे. वैशाली माडे ही शेतकरी कुटुंबातून आली आहे. हिंदी, मराठी चित्रपटांसह तिने अनेक मराठी मालिकांची ‘टायटल साँग’देखील गायली आहेत. ‘भारतरत्न’ लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती जबरदस्त फॅन आहे. मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button