वडेट्टीवार, भुजबळांचा राजीनामा घ्या; मराठा क्रांती मोर्च्याची मागणी

Vijay Wadettiwar & Chhagan Bhujbal

कोल्हापूर : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नेहमी मराठा समाजाविरुद्ध बोलत असतात. सांविधानिक पदावरील व्यक्तींने असे वक्तव्य करणे योग्य नाही.

राज्यपालांनी या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्च्याने केली आहे. याचप्रमाणे ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ ही संघटनाही मराठा समाजाविरुद्ध भूमिका घेत असते, त्यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा मोर्च्याने पत्रपरिषदेत दिला. दिलीप पाटील म्हणालेत, सरकारने मराठा समाजाला दिलेल्या ईडब्ल्यू आरक्षणामुळे आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

म्हणून आम्ही ईडब्ल्यू आरक्षणाला विरोध करत आहोत. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष, मंत्री अशोक चव्हाण जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. मराठा समाजाविरुद्ध भूमिका घेणारे मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांचाही राजीनामा घेण्यात यावा. सचिन तोडरकर यांनी सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनवर टीका केली. म्हणालेत, या संघटनेच्या आडून काही लोक मराठा आरक्षणाबाबत मोर्चे काढत आहेत, न्यायालयात जात आहेत. राज्यातील आरक्षणाच्या प्रकरणात या बाहेरील लोकांचा संबंध नाही. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आम्ही यादी तयार केली असून लवकरच त्यांच्या घरासमोर आंदोलन करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER