महाराष्ट्रातील अनलॉकवर वडेट्टीवार पुन्हा बोलले; मंजुरीनंतर दुपारपर्यंत अधिसूचना

Maharashtra Today

नागपूर : राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) उठवण्यावरून गुरुवारी झालेल्या गोंधळानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हात झटकले होते. मात्र, परत आता अनलॉकसंदर्भात अंतिम मसुदा तयार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवला आहे. त्यांची मंजुरी मिळताच दुपारपर्यंत अधिसूचना निघेल आणि जिल्ह्यातील परिस्थितीनुसार नियमावली लागू होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

यावेळी वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी राज्यातील अनलॉकबाबत केलेल्या घोषणा त्यानंतर राज्य सरकारने दिलेले स्पष्टीकरण आणि वडेट्टीवार यांनी घेतलेला यू-टर्न यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. “लॉकडाऊनमधून बाहेर नेमके कसे पडता येईल, याबाबत महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काही गाइडलाइन्स तयार केल्या आहेत. याबाबतचा मसुदा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही. ५ टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील. एकदा मान्यता मिळाली की जिल्हावार परिस्थितीचा आढावा घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. आज दुपारपर्यंत बहुधा याबाबतचे नोटिफिकेशन निघेल.” असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button